Nov 14, 2024 - by Ghar junction
51 views
डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दिपेश म्हात्रे यांनी आपल्या जाहीरनाम्यात डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस योजना सादर केली आहे. या जाहीरनाम्यात, डोंबिवलीतील प्रशासकीय सुविधांना एकत्र आणण्यासाठी स्व. रामभाऊ कापसे प्रशासकीय भवनाची निर्मिती, नवीन रोजगार संधी निर्माण करण्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिझनेस सेंटरद्वारे 1 लाख रोजगाराची निर्मिती, तसेच ३५० एकर रेल्वे जागेचा व्यावसायिक विकास करून आयटी हब आणि बँकिंग क्षेत्र उभारण्याचा संकल्प समाविष्ट आहे.
याशिवाय, उत्तम दर्जाची सरकारी आरोग्यसेवा, वाहतूक व पार्किंग समस्यांचे निराकरण, पाणीटंचाईवर उपाय, वेद पाठशाळा, वयोवृद्ध देखभाल केंद्र आणि २४x७ मदतवाहिनी आदी सुविधांचा समावेश या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. या सर्व मुद्द्यांद्वारे, दिपेश म्हात्रे यांनी डोंबिवलीच्या शाश्वत आणि समृद्ध भविष्यासाठी सर्वसमावेशक योजना साकार करण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला आहे
Recent comments(0)