Nov 19, 2024 - by Ghar junction
8 views
कल्याण, दि. 18 नोव्हेंबर:
कल्याण कोर्टातील दिवाणी वकील संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी आणि सदस्यांची भेट घेऊन, त्यांच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी दिले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह वकिलांशी संवाद साधला. वकिलांनी जुन्या कोर्ट इमारतीच्या पुनर्बांधणीपासून ज्युनिअर वकिलांसाठी स्टायपेंड लागू करण्यासह वकिलांवरील हल्ल्यांविरोधात कठोर कायदा तयार करण्याच्या मागण्या मांडल्या. यावर बोलताना, भोईर यांनी यापूर्वी विधानसभेत काही मुद्दे मांडल्याचे सांगत उर्वरित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीत दिवाणी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. सुदेश गायकवाड, उपाध्यक्ष ॲड. प्रकाश रासकर, खजिनदार ॲड. जयदीप हजारे यांच्यासह अनेक वरिष्ठ आणि तरुण वकिलांचा सक्रिय सहभाग होता. वकील संघटनेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करताना, नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिम मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला विजय मिळवून देण्याचे आवाहन केले. जुन्या कोर्ट इमारतीचे नूतनीकरण आणि वकिलांवरील हल्ल्यांसाठी राजस्थानप्रमाणे कायदा लागू करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याने वकिलांमध्ये अपेक्षांचे नवे पर्व निर्माण झाले आहे.
Recent comments(0)