दुर्गाडी किल्ला" हा राज्य शासनाच्या मालकीचाच; कल्याण दिवाणी न्यायालयाने फेटाळला मुस्लिम संघटनेचा दावा

Dec 11, 2024 - by Ghar junction

45 views

दुर्गाडी किल्ला" हा राज्य शासनाच्या मालकीचाच; कल्याण दिवाणी न्यायालयाने फेटाळला मुस्लिम संघटनेचा दावा

कल्याण, दि. 10 डिसेंबर:
ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या मालकीबाबत कल्याण दिवाणी न्यायालयाने तब्बल चार दशकांनंतर ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायालयाने किल्ल्यावरील मुस्लिम संघटनेच्या मालकीचा दावा फेटाळत, ही जागा राज्य शासनाच्या मालकीची असल्याचे स्पष्ट केले. हा निर्णय सरकारी वकील ॲड. सचिन कुलकर्णी यांनी जाहीर केला.

गेल्या 45 वर्षांपासून दुर्गाडी किल्ल्याच्या मालकीसाठी सुरू असलेल्या या प्रकरणात, मजलिस ए मुशायरा ट्रस्टकडून किल्ल्यावरील मालकी हक्काचा दावा करण्यात आला होता. परंतु, न्यायालयाने हा दावा मुदतबाह्य असल्याचे सांगत फेटाळला. तसेच वक्फ बोर्डाच्या दाव्यालाही नकार देत किल्ल्याची जागा शासनाची असल्याचे ठामपणे जाहीर केले.

या निकालामुळे हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना आणि भाजपने न्यायव्यवस्थेचे आभार मानले आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली दुर्गाडी देवी मंदिरात आरती करून विजय साजरा करण्यात आला. अनेक वर्षांपासून कायदेशीर लढा देणारे दिनेश देशमुख आणि पराग तेली यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.

हा निकाल दुर्गाडी किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला आणि कल्याण नगरीच्या सांस्कृतिक ओळखीला एक नवा आधार देणारा ठरला आहे.

Recent comments(0)

Leave a comment


 8055000190

Thank You
Ok
Alert
Ok
Enquire Now
Please fill out below details